डिजिटल रामनाम वही

आजच्या घडीला लाखो श्रद्धावान सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी २००५ साली सुरू केलेल्या आगळ्यावेगळ्या बँकेचे खातेदार होऊन भक्तीमार्गावरील सहजसोप्या प्रवासाचा आनंद लुटत आहेत.

परंतु बदलत्या काळाला अनुसरून या रामनाम वहीचे नवे अनोखे स्वरूप सद्‍गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानूसार श्रद्धावानांना उपलब्ध करून देण्यात आले.

श्रद्धावानांचा वाढता प्रतिसाद आणि तंत्रज्ञानाच्या वापराची सांगड घालून ७ ऑगस्ट, २०१८ रोजी ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ची अत्याधुनिक व प्रगत अशी ‘डिजिटल’ आवृत्ती सादर करण्यात आली. स्मार्टफोन्स व टॅबमध्ये सर्वाधिक वापर असणार्‍या ‘ऍन्ड्रॉईड’ प्रणालीवर आधारित ‘ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही’ उपलब्ध करून देण्यात आली. ‘ऍप्लिकेशन’ अर्थात ‘ऍप’च्या स्वरुपात आलेल्या या डिजिटल आवृत्तीच्या रुपात रामनामाची पूर्ण बँकच आता थेट श्रद्धावानांच्या हाती आली आहे.

गुगलच्या प्ले – स्टोअर वर ‘https://play.google.com/store/apps/details?id=com.ramnaam_bank.ramnaambook‘ या संकेतस्थळावर हे ऍप सर्वांसाठी उपलब्ध आहे. या ऍपद्वारे ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’मध्ये नवा अकाऊंट (खाते) उघडणे, रामनामाची वही घेणे आणि रामनाम लिहिणे या गोष्टी अगदी सहजगत्या करता येतात. त्याही अगदी जागच्या जागी! एकदा वही घेतल्यानंतर इंटरनेट नसलं तरी म्हणजेच ‘ऑफलाईन’ असतानादेखील रामनाम लेखनात खंड पडणार नाही, याची काळजी ‘ऍप’ मध्ये घेण्यात आली आहे. वही पूर्ण झाल्यावर ती सहजपणे आपल्या अकाऊंटमधे ‘ऍड’ होण्याची व खातं अपडेट करण्याची सुविधाही ऍपमध्ये आहे.

हिंदी English

 Contact Us

Address:

101, Link Apartments, Old Khari Village, Khar (W), Mumbai – 40052, Maharashtra, India

Email Address: aubr.ramnaam@gmail.com

Timing: Monday to Saturday – 11 am to 7.30pm  (Excluding Thursday)

              Thursday: Thursday 11 am to 4 pm