रामनामाचे महत्त्व

रामनामाचं महत्व विषद करताना सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध म्हणतात की रामनाम हे स्वतः सद्‌गुरु आहे. रामनामाबद्दल सांगितले गेले आहे आहे की रामनामाने नाश झाला नाही अशी पापं नाहीत आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी नाही आणि होणारही नाही. आणि म्हणूनच ह्या भारतभूमीवरील तुलसीदास, रामदास यांसारखे अनेक संत या रामनामाचे महत्व आपल्यासमोर मांडतात.

रामाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या तपश्च्यर्यांची किंवा साधनांची गरज नाही. राम हा कोणी जरी थोडीशी सुद्धा भक्ति केली, त्याच्यासाठी अगदी अल्पही प्रयास केले, तरी त्या भक्ताचे कल्याण करतो.

अनेक संतांनी रामनामाचे महत्व अनेक ग्रंथातून, अभंगातून, त्यांच्या रचनांमधून सांगितले आहे.
उदाहरण द्यायचेच झाले तर :

१) संत तुलसीदासजी त्यांच्या रामचरितमानस या ग्रंथातील सुंदरकांड या पर्वात म्हणतात,

प्रबिसि नगर कीजे सब काजा। हृदयँ राखि कौसलपुर राजा।
गरल सुधा रिपु करहिं मिताई। गोपद सिंधु अनल सितलाई ।।

                                                                                              (सुंदरकांड २९)

(अर्थ: आपण नगरात शिरुन सर्व काम करावे. श्रीरामांना ह्र्द्यात धारण करुन काम करताना विषदेखील अमृत होते व शत्रूदेखील त्याच्याशी मैत्री करतो. समुद्र गायीच्या खुराच्या आकाराच्या खड्ड्यात सामावला जातो व अग्नीचा दाहकपणा दूर होतो.)

’जय जय रामकृष्ण हरि’ हा भागवत धर्माचा महामंत्रच श्रेष्ठ संत तुकारामांना त्यांच्या सद्‌गुरुंनी दिला अमृतमंथनाच्या वेळेस बाहेर आलेले हलाहल विष प्यायलानंतर परमशिवाला दाह होऊ लागला व त्या दाहाचे शमन केवळ रामनामाचा जप केल्यानेच झाले आणि प्रत्यक्ष हनुमानजीही सुंदरकांडामध्ये प्रभू रामचंद्रांना सांगतात,

सो सब तव प्रताप रघुराई। नाथ न कछू मोरि प्रभुताई।।

                                                                 (सुंदरकांड १८९)

(अर्थ: हे रघुनाथा! सर्वकाही आपल्या प्रतापामुळेच घडले. हे नाथ! त्यात माझा काहीही मोठेपणा नाही.)

 

English हिंदी



Contact Us

Address:

101, Link Apartments, Old Khari Village, Khar (W), Mumbai – 40052, Maharashtra, India

Email Address: aubr.ramnaam@gmail.com

Timing: Monday to Saturday – 11 am to 7.30pm  (Excluding Thursday)

              Thursday: Thursday 11 am to 4 pm